Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️प्रकाश कदम  पोलादपूर प्रतिनिधी : भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज पोलादपूर शहरात राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली व पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने “रन फॉर युनिटी” म्हणजेच एकता दौड चे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमाचा उद्देश देशातील एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या एकता दौडला सकाळी प्रारंभ झाला. पोलादपूर शहरातील मुख्य बाजारपेठ, महाबळेश्वर रस्ता आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून दौडचे मार्गक्रमण झाले. विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय ध्वज आणि "एक भारत, श्रेष्ठ भारत" अशी घोषवाक्ये झळकत होती. या एकता दौडमध्ये सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा ...

गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

गवळी मोहल्ल्यात ड्रेनेज ओव्हरफ्लोचा त्रास; नागरिक संतप्त, महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह मिलिंद काळे– महाबळेश्वर प्रतिनिधी  महाबळेश्वर : शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. “स्वच्छ महाबळेश्वर – सुंदर महाबळेश्वर” हा नारा केवळ मुख्य बाजारपेठेपुरता मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. गवळी मोहल्ल्यातील अस्लम बेपारी यांच्या घराशेजारील ड्रेनेज लाईन फुटल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून, संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात महाबळेश्वर नगरपालिका कार्यालयात जाऊन तोंडी तक्रार केली. तसेच वारंवार फोनद्वारे संपर्क साधून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून “आज करतो”, “उद्या करतो” अशा आश्वासनांपलीकडे काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार फोन येत असल्याने नगरपालिकेचे मुकादम मनोज चव्हाण यांनी आता फोन उचलणेच बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून, आता या प्रकरणाची तक्रार मुख्य...

इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा पूरग्रस्तांसाठी पुढाकारसमाजसेवेचा आदर्श ठरलेला उपक्रम

🌸 इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा पूरग्रस्तांसाठी पुढाकार समाजसेवेचा आदर्श ठरलेला उपक्रम ✍️ प्रेषित गांधी ,  महाबळेश्वर प्रतिनिधी :  महाबळेश्वर (दि. २९ ऑक्टोबर) — समाजातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देत इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर ने पुन्हा एकदा संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे. क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली, सचिव सौ. सपना अरोरा आणि सौ. मुक्ता कोमटी यांच्यासह सर्व सदस्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी जिल्हास्तरीय मदत प्रकल्पात सहभाग नोंदवून योगदान दिले. या उपक्रमांतर्गत क्लबच्या वतीने एकूण ₹२३,०००/- इतकी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी पाठविण्यात आली आहे. हा प्रकल्प डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीडीसी / प्रकल्प समन्वयक नगिना मॅडम यांच्या समन्वयातून राबविण्यात आला. हा इंटर डिस्ट्रिक्ट झोनल संयुक्त प्रकल्प असून, विविध क्लबांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांना आवश्यक मदत मिळणार आहे. 💠 ठळक मुद्दे : इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा सामाजिक जब...

साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न

साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न ✍️ प्रकाश कदम,  पोलादपूर प्रतिनिधी :  पोलादपूर, दि. २९ ऑक्टोबर — रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत केवनाळे पुनर्वसन आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष  निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर चंद्रकांत मोरे,अनिल मालुसरे, अजय सलागरे, तसेच पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसनासाठी दरडग्रस्थाना प्राधान्याने राहण्यासाठी घरे ...

विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ✍️.  प्रकाश कदम,  पोलादपूर  प्रतिनिधी –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असताना, महाड तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. शिवसेना पक्ष पुन्हा एकदा जिद्दीने आणि दमदार रणनीतीसह कामाला लागला असून, विरोधकांच्या छावण्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विशेषतः युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य व कोकण सचिव विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज महाड तालुक्यात झंझावात निर्माण करत आहे. महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचा धडाका आणि युवा सेनेच्या नेतृत्वात असलेल्या विकासशेठ गोगावले यांचा जनसंपर्काचा दांडगा अनुभव पाहून अनेक कार्यकर्ते आता शिवसेनेच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत. त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे विन्हेरे जिल्हा परिषद गणातील राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला जबर धक्का. काल दिनांक २६ ऑक्टोबर रोजी विकासशेठ गोगावले यांच्या ल...

पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. माजी उपसभापती शैलेश विठ्ठल सलागरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश — शिवसेनेला नवसंजीवनी

 पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का माजी उपसभापती शैलेश विठ्ठल सलागरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश — शिवसेनेला नवसंजीवनी प्रकाश कदम , पोलादपूर प्रतिनिधी :   पोलादपूर तालुक्यातील राजकारणाला नवीन दिशा देणारी महत्त्वपूर्ण घटना आज घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी पंचायत उपसभापती शैलेश विठ्ठल सलागरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेत नवी ऊर्जा संचारल्याचा माहोल आहे. सलागरे यांच्या नेतृत्वाखाली अधिक सुमारे ७० शिवसैनिकांनी आज शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. यामध्ये गावपातळीवरील कार्यकर्त्यांसह महिला, युवक, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या मोठ्या शक्तिप्रदर्शनामुळे तालुक्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ✳ प्रमुख नेत्यांची उपस्थिती — उत्साहात रंगला पक्षप्रवेश सोहळा या भव्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते— नामदार भरतशेठ गोगावले जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे संजय मोदी , अनिल द...

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

पोस्टाची पेटी पत्राच्या प्रतीक्षेत — टपाल सेवेचा प्रवास डिजिटल युगाकडे!

पोस्टाची पेटी पत्राच्या प्रतीक्षेत — टपाल सेवेचा प्रवास डिजिटल युगाकडे! प्रकाश कदम, पोलादपूर प्रतिनिधी पूर्वीच्या काळात आप्तेष्टांना किंवा प्रिय व्यक्तींना पत्र लिहिणे ही एक भावनिक प्रक्रिया होती. त्या पत्रांतील प्रत्येक अक्षरात प्रेम, माया आणि आपुलकीचा ओलावा असायचा. "पोस्टाची पेटी" म्हणजे संपर्काचा मुख्य दुवा! पण आजच्या डिजिटल युगात हीच पेटी पत्रांच्या प्रतीक्षेत उभी आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढलेल्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, आणि व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांमुळे काही क्षणांत संदेश पोहोचू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी संवादाचं प्रमुख माध्यम असलेली पत्रव्यवस्था आता दुर्मिळ होत चालली आहे. तरीसुद्धा,  भारतीय टपाल विभाग  आजही अविरतपणे आपली विविध सेवा लोकांपर्यंत पोहोचवत आहे. 🌍  जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल सेवेचा गौरव दरवर्षी  9 ऑक्टोबर  रोजी 'जागतिक टपाल दिन' साजरा केला जातो. हा दिवस टपाल सेवेच्या ऐतिहासिक योगदानाची आणि आजही सुरु असलेल्या सातत्यपूर्ण सेवेची जाणीव करून देतो. इंटरनेटच्या युगातही लाखो लोक अजूनही टपालावर विश्वास ठेवतात. युनिव्हर्सल पोस्टल ...

श्री. सुभाष जोतीराम ढाणे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात भावनिक वातावरण; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर

श्री. सुभाष जोतीराम ढाणे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात भावनिक वातावरण; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर प्रकाश कदम,  पोलादपूर प्रतिनिधी : कांगोरीगड माध्यमिक विद्यालय, मोरसडे येथे गेली ३३ वर्षे अध्यापनाची अखंड सेवा बजावणारे आदरणीय शिक्षक श्री. सुभाष जोतीराम ढाणे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात भावनांचा महापूर ओसंडून वाहिला. आपल्या प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांना अश्रू अनावर झाले. विद्यालयाच्या परिसरात झालेला हा सोहळा शिक्षक-विद्यार्थी नात्याच्या दृढतेचा आणि आदराचा प्रतीक ठरला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ विद्यालयात अखंड निष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयी अपार प्रेमाने कार्य करणारे ढाणे सर केवळ शिक्षक नव्हते, तर एक मार्गदर्शक, स्नेही व प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित केला. त्यामुळे सरांची सेवापूर्ती ही केवळ एक प्रशासकीय घटना नसून, भावनिक क्षण ठरला. समारंभाच्या प्रारंभी ढाणे सरांचा भव्य सत्कार मिरवणुकीतून करण्यात आला. विद्यालयापासून ते स्थानिक मंद...

गावोगावी “प्लास्टिकला प्रवेशबंदी” – समृद्ध पंचायतराज अभियानातून पर्यावरणपूरक उपक्रमाला गती

गावोगावी “प्लास्टिकला प्रवेशबंदी” – समृद्ध पंचायतराज अभियानातून पर्यावरणपूरक उपक्रमाला गती विजय जाधव , सातारा प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आता ग्रामीण महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या “प्लास्टिक प्रदूषण” विरोधातील लढ्यात गावोगावी “प्लास्टिकला प्रवेशबंदी” लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभाग घेऊन १०० टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केल्यास त्यांना अभियानातील गुणांकनात एक विशेष गुण मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात ग्रामपंचायतींना फक्त स्पर्धेत गुण मिळविण्याची नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची वास्तविक जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या गावांना “स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि समृद्ध ग्राम” म्हणून गौरविण्यात येईल. 🌿 प्लास्टिकमुक्त ग्राम – काळाची गरज एकदा वापरून फेकले जाणारे प्लास्टिक (Single Use Plastic) हे न विघटनशील असल्यामुळे नद्या, समु...

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर विलास काळे, महाबळेश्वर  प्रतिनिधी: महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सन २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी प्रभागनिहाय आरक्षित जागा ठरविण्यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खादी व ग्रामोद्योग सभागृह, महाबळेश्वर येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर आरक्षणाचे तपशील ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाबळेश्वर नगरपरिषदेत प्रसिद्ध केले जाणार आहेत. यानंतर नागरिकांना या आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ अशी मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपली हरकत लेखी स्वरूपात, सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासक तथा मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालयात सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नगरपरिषद प्रशासनाने पुढे सांगितले की, आरक्षण स...

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ

अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा “साहित्य संगम सोहळा” उत्साहात पार – आगरी संस्कृतीच्या जतनाचा संकल्प दृढ  मिलिंद खारपाटील, मांडला  प्रतिनिधी : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित “साहित्य संगम सोहळा” अलिबाग तालुक्यातील मांडला येथील ग्रीन किंग रिसॉर्ट येथे रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात व साहित्यिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील शेकडो आगरी साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अमृत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ. मानसी म्हात्रे , संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे , ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भोपी , साहित्यिक चंद्रकांत पाटील , ‘आवाज महामुंबईचा’ चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील , ॲड. राकेश पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वावे गावातील कलाकारांनी सादर केलेल्या गायन आणि भवर नृत्याने आगरी संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवले. त्यानंतर स्वागतपर भाषणात संस्थेचे अ...