Skip to main content

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप 

 तापोळा – प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनाट, तापोळा, आंबेनळी परिसरात रानगवे, रानडुक्कर यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा वनविभागाकडे लेखी तक्रारी करून गस्त वाढविणे, सापळे लावणे, आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु, विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणारा आहे. भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच बंद केले आहे. तरीसुद्धा प्रशासन आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

गावकऱ्यांनी तातडीने या परिसरात वनविभागाच्या गस्त पथकांची नियुक्ती करावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच गव्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


---

Comments

Popular posts from this blog

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद कुंभरोशी प्रतिनिधी – कुंभरोशी गणातील अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार असूनही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार आणि जनतेच्या सतत संपर्कात राहणारी कार्यपद्धती यामुळे समीर चव्हाण यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी असावी, हा अजेंडा घेऊन ते कुंभरोशी गणात घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न तसेच ग्रामविकासाशी संबंधित मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर समीर चव्हाण थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. “निवडणुकीपुरते येणारे नेते नव्हे, तर कायम जनतेसोबत राहणारा प्रतिनिधी निवडून द्या,” असे आवाहन ते प्रत्येक भेटीतून करत आहेत. त्यांच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत. या प्र...

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील घोगलवाडी येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोगलवाडी येथील शेतकरी बबन धोंडू राजपुरे यांच्या गाईवर शनिवारी (काल) रात्री वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला वाघ अथवा बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी नेमका कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला होता, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. वन विभागाच्या तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्रीच्या वेळी जनावरे व शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्...