गॅस संपला तरी सेवाभाव कायम; पोलादपूरमधील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी शेगडीवर भाकऱ्या भाजून प्रवाशांना दिले अन्न
गॅस संपला तरी सेवाभाव कायम; पोलादपूरमधील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी शेगडीवर भाकऱ्या भाजून प्रवाशांना दिले अन्न पोलादपूर प्रतिनिधी : प्रवासादरम्यान अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदतीचा हात देत पोलादपूर तालुक्यातील आरती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिला कार्यकर्त्यांनी मानवी संवेदनशीलतेचे अनोखे उदाहरण घालून दिले. परिसरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक छोट्या हॉटेलांमध्ये स्वयंपाक करणे अशक्य झाले होते. त्यामुळे दूरवरून आलेल्या प्रवाशांना जेवण मिळणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत या महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक शेगडी पेटवून भाकऱ्या भाजत उपाशी प्रवाशांना जेवण देण्याचा प्रयत्न केला. पोलादपूर परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि पर्यटक ये-जा करत असतात. मात्र अचानक गॅस संपल्यामुळे अनेक छोट्या हॉटेलांमध्ये स्वयंपाक बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना जेवणासाठी मोठी अडचण निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात येताच आरती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत स्थानिक छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीने पारंपरिक शेगडीचा वापर करून स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. गॅस उ...