“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला”
“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला” प्रतापगड प्रतिनिधी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड (ता. महाबळेश्वर) येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आदिशक्ती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या यात्रोत्सवाचे यंदा सोळावे वर्ष असून, दि. १४ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांची मेजवानी ग्रामस्थांसह भाविकांना अनुभवायला मिळत आहे. यात्रोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी देवीच्या भव्य पालखी मिरवणुकीने, काठी उभारणी आणि महाप्रसादाने झाली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी ४३ गावांतील पारंपरिक विडे वर्तवण्याचा सोहळा पार पडला. १६ एप्रिल रोजी स्वराज्य लेझीम पथकाच्या दिमाखदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले, तर मध्यरात्री पारंपरिक ‘बगाड’ सोहळ्याने यात्रोत्सवाला धार्मिक उंची प्राप्त झाली. यात्रोत्सवात धार्मिक...