Skip to main content

Posts

भाग २: पहिला डाव आणि कोडचा सापळा

भाग २: पहिला डाव आणि कोडचा सापळा अद्वैतने वॉशबेसिनमधील थंड पाण्याचा एक जोरात हबका तोंडावर मारला. पाण्याचे थेंब त्याच्या हनुवटीवरून ओघळत होते. त्याने पुन्हा मान वर करून आरशात पाहिले. चेहऱ्यावरचा थकवा आणि थरथर हळूहळू नाहीशी झाली होती. त्या जागी आता एक लोखंडी निश्चय दाटून आला होता. "अद्वैत! किती वेळ?" दरवाजाबाहेरून अनघाचा आवाज आला. "आलोच, अनघा. फक्त दोन मिनिटं," अद्वैतने स्वतःचा आवाज शक्य तितका शांत ठेवत उत्तर दिले. त्याने कपाटातून त्याचा जुना, नीट इस्त्री केलेला फॉर्मल शर्ट काढला. शर्टची बटणे लावत असताना त्याचे लक्ष खोलीतील लहानशा स्टडी टेबलवर गेले. तिथे त्याचा जुना लॅपटॉप उघडा होता. स्क्रीनवर 'प्रकल्प कालचक्र' (Project Chronos) च्या अगदी सुरुवातीच्या कोडच्या ओळी चमकत होत्या. बरोबर सात वर्षांपूर्वीचा हाच तो दिवस होता. आज दुपारी एका मोठ्या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनीसमोर त्यांचे पहिले प्रेझेंटेशन होणार होते. आणि आजच संध्याकाळी विक्रांतने एका अज्ञात आंतरराष्ट्रीय क्लायंटचा हवाला देऊन प्रकल्पाच्या मुख्य कोडची एक 'बॅकअप कॉपी' स्वतःच्या हार्ड ड्राईव्हमध्य...
Recent posts

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील घोगलवाडी येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोगलवाडी येथील शेतकरी बबन धोंडू राजपुरे यांच्या गाईवर शनिवारी (काल) रात्री वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला वाघ अथवा बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी नेमका कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला होता, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. वन विभागाच्या तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्रीच्या वेळी जनावरे व शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्...

आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन उत्साहात साजरा; शेकडो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ

आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन उत्साहात साजरा; शेकडो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ महाबळेश्वर, दि. 23 : तहसील कार्यालय महाबळेश्वर, पंचायत समिती महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बाल विकास विभाग (आयसीडीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिनानिमित्त खादी ग्रामोद्योग मधसंचनालय, महाबळेश्वर येथे विशेष सक्षमीकरण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील एकल महिला, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या पदाधिकारी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन मस्के, गटविकास अधिकारी विजय विभुते, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, पंचायत समिती सभापती शकुंतला रमेश चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्या वंदना प्रवीण भिलारे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, प्रवीण भिलारे, जिल्हा समन्वयक समिती सदस्य...

“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला”

“प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिशक्तीचा जल्लोष; पारसोंड येथे श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव भक्ती, समाजसेवा आणि क्रीडांचा संगम ठरला” प्रतापगड प्रतिनिधी :  सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड (ता. महाबळेश्वर) येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आदिशक्ती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या यात्रोत्सवाचे यंदा सोळावे वर्ष असून, दि. १४ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांची मेजवानी ग्रामस्थांसह भाविकांना अनुभवायला मिळत आहे. यात्रोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी देवीच्या भव्य पालखी मिरवणुकीने, काठी उभारणी आणि महाप्रसादाने झाली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी ४३ गावांतील पारंपरिक विडे वर्तवण्याचा सोहळा पार पडला. १६ एप्रिल रोजी स्वराज्य लेझीम पथकाच्या दिमाखदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले, तर मध्यरात्री पारंपरिक ‘बगाड’ सोहळ्याने यात्रोत्सवाला धार्मिक उंची प्राप्त झाली. यात्रोत्सवात धार्मिक...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...

गॅस संपला तरी सेवाभाव कायम; पोलादपूरमधील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी शेगडीवर भाकऱ्या भाजून प्रवाशांना दिले अन्न

गॅस संपला तरी सेवाभाव कायम; पोलादपूरमधील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी शेगडीवर भाकऱ्या भाजून प्रवाशांना दिले अन्न पोलादपूर प्रतिनिधी :  प्रवासादरम्यान अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदतीचा हात देत पोलादपूर तालुक्यातील आरती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिला कार्यकर्त्यांनी मानवी संवेदनशीलतेचे अनोखे उदाहरण घालून दिले. परिसरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक छोट्या हॉटेलांमध्ये स्वयंपाक करणे अशक्य झाले होते. त्यामुळे दूरवरून आलेल्या प्रवाशांना जेवण मिळणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत या महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक शेगडी पेटवून भाकऱ्या भाजत उपाशी प्रवाशांना जेवण देण्याचा प्रयत्न केला. पोलादपूर परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि पर्यटक ये-जा करत असतात. मात्र अचानक गॅस संपल्यामुळे अनेक छोट्या हॉटेलांमध्ये स्वयंपाक बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना जेवणासाठी मोठी अडचण निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात येताच आरती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत स्थानिक छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीने पारंपरिक शेगडीचा वापर करून स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. गॅस उ...

महाबळेश्वरमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वरमध्ये संत रोहिदास महाराज जयंती त्साहात साजरी महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून संतांच्या विचारांना अभिवादन केले. कार्यक्रमात विजय नायडू यांनी मनोगत व्यक्त करताना संत रोहिदास महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा संदेश देणारे संत रोहिदास महाराज आजच्या काळातही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विषमता दूर करून सर्वांना समानतेच्या आधारावर जगण्याची प्रेरणा संत रोहिदास महाराजांनी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर राजेश कुंभारदरे यांनी मनोगतातून संत रोहिदास महाराजांच्या विचारांची उपयुक्तता मांडली. संत रोहिदास महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे संत असून त्यांचे विचार समाज एकसंध ठेवण्यासाठी आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी...