Skip to main content

Posts

Showing posts from January, 2026

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांची प्रचारसभा उत्साहात; चतुरबेट येथील मंदिरात ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांची प्रचारसभा उत्साहात; चतुरबेट येथील मंदिरात ग्रामस्थांची मोठी उपस्थिती कुंभरोशी प्रतिनिधी– पंचायत समिती महाबळेश्वर अंतर्गत कुंभरोशी गणासाठी चतुरबेट येथे अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांची प्रचारसभा उत्साहात पार पडली. गावातील मंदिर परिसरात झालेल्या या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून प्रचार शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. समीर चव्हाण यांनी यावेळी स्थानिक प्रश्नांवर सविस्तर भाष्य करत नागरिकांना निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन केले. सभेत बोलताना चव्हाण यांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा, शिक्षणाच्या सुविधा, तरुणांचा रोजगार आणि शेतीविषयक अडचणी या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली. गावागावातील मूलभूत सुविधांचा अभाव, योजनांची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आणि लोकप्रतिनिधींचा जनतेपासून वाढलेला दुरावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यास सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही दबावाशिवाय...

ग्रामस्थांच्या भेटीगाठींमधून प्रचाराला गती; मुंबईतील गावकरीही समीर चव्हाण यांच्या पाठीशी ठाम

ग्रामस्थांच्या भेटीगाठींमधून प्रचाराला गती; मुंबईतील गावकरीही समीर चव्हाण यांच्या पाठीशी ठाम बिरवाडी प्रतिनिधी – काळभैरवाच्या आशीर्वादाने आपल्या मातीचा सुगंध श्वासात घेऊन आणि गावाचं दुःख–सुख मनात साठवून काम करणारे गावचेच सुपुत्र समीर मधुकर चव्हाण यांनी कुंभरोशी गणातून पंचायत समितीच्या सदस्यपदासाठीअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा प्रचार वेग घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत समीर चव्हाण थेट संवाद साधत असून, या भेटींमुळे प्रचाराला अधिक बळ मिळालं आहे. मुंबईतील सुखसोयींचं आयुष्य बाजूला ठेवून आपल्या गावासाठी आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतलेल्या समीर चव्हाण यांच्या भूमिकेचं गावकऱ्यांकडून विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून, विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गावचा खरा कणा असलेल्या तरुणांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत “घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे” असं ठामपणे सांगणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विकासाचा...

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद कुंभरोशी प्रतिनिधी – कुंभरोशी गणातील अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार असूनही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार आणि जनतेच्या सतत संपर्कात राहणारी कार्यपद्धती यामुळे समीर चव्हाण यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी असावी, हा अजेंडा घेऊन ते कुंभरोशी गणात घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न तसेच ग्रामविकासाशी संबंधित मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर समीर चव्हाण थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. “निवडणुकीपुरते येणारे नेते नव्हे, तर कायम जनतेसोबत राहणारा प्रतिनिधी निवडून द्या,” असे आवाहन ते प्रत्येक भेटीतून करत आहेत. त्यांच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत. या प्र...

ऑल इंडिया पँथर सेनेला साताऱ्यात बळकटी; अनिल मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

ऑल इंडिया पँथर सेनेला साताऱ्यात बळकटी; अनिल मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती  ✍️मिलिंद काळे, महाबळेश्वर प्रतिनिधी : ऑल इंडिया पँथर सेनेच्या सातारा जिल्हा संघटनेत नव्या ताकदीची भर पडली असून अनिल मोरे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यात संघटन बळकटीसाठी हा निर्णय निर्णायक मानला जात आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार गावागावात संघटन विस्तार करणे, आंबेडकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, तसेच भारतीय संविधानाचे संरक्षण व त्याबाबत जनजागृती करणे, ही जबाबदारी नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत लोकशाही मूल्ये, आरक्षण व्यवस्था, संविधान व मूलभूत हक्कांवर होत असलेल्या आघातांविरोधात संघटितपणे संघर्ष करण्याची गरज अस...