✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
ऑल इंडिया पँथर सेनेच्या सातारा जिल्हा संघटनेत नव्या ताकदीची भर पडली असून अनिल मोरे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यात संघटन बळकटीसाठी हा निर्णय निर्णायक मानला जात आहे.
संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार गावागावात संघटन विस्तार करणे, आंबेडकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, तसेच भारतीय संविधानाचे संरक्षण व त्याबाबत जनजागृती करणे, ही जबाबदारी नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत लोकशाही मूल्ये, आरक्षण व्यवस्था, संविधान व मूलभूत हक्कांवर होत असलेल्या आघातांविरोधात संघटितपणे संघर्ष करण्याची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या नियुक्तीप्रसंगी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड, जिल्हा महासचिव आशीष मोरे, युवक जिल्हाध्यक्ष ऋषी घाडगे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अनिल मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक चळवळीचा अनुभव आणि संघटनात्मक कामाची जाण लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात संघटनेची कार्यक्षमता वाढून समाजहिताच्या लढ्याला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment