आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन उत्साहात साजरा; शेकडो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ महाबळेश्वर, दि. 23 : तहसील कार्यालय महाबळेश्वर, पंचायत समिती महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बाल विकास विभाग (आयसीडीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिनानिमित्त खादी ग्रामोद्योग मधसंचनालय, महाबळेश्वर येथे विशेष सक्षमीकरण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील एकल महिला, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या पदाधिकारी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन मस्के, गटविकास अधिकारी विजय विभुते, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, पंचायत समिती सभापती शकुंतला रमेश चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्या वंदना प्रवीण भिलारे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, प्रवीण भिलारे, जिल्हा समन्वयक समिती सदस्य...