Skip to main content

आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन उत्साहात साजरा; शेकडो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ

आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन उत्साहात साजरा; शेकडो महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ

महाबळेश्वर, दि. 23 : तहसील कार्यालय महाबळेश्वर, पंचायत समिती महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि महिला व बाल विकास विभाग (आयसीडीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिनानिमित्त खादी ग्रामोद्योग मधसंचनालय, महाबळेश्वर येथे विशेष सक्षमीकरण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील एकल महिला, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या पदाधिकारी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन मस्के, गटविकास अधिकारी विजय विभुते, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, पंचायत समिती सभापती शकुंतला रमेश चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्या वंदना प्रवीण भिलारे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, प्रवीण भिलारे, जिल्हा समन्वयक समिती सदस्य गणेश उतेकर, तालुका शिवसेना प्रमुख मंगेश संकपाळ (लाखवड) तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकल महिलांचा स्वयंसहाय्यता बचत गटांमध्ये समावेश करून त्यांना सामुदायिक गुंतवणूक निधी (सीआयएफ) वितरित करण्यात आला. तसेच लखपती दीदी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसंघ आणि स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थींना मंजुरी आदेश व प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

यावेळी आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आदी विविध कल्याणकारी योजनांच्या पात्र लाभार्थींना मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

महिलांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित महिलांनी या आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकल महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाने एकल महिलांच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना उमेदच्या प्रभाग समन्वयक सीमा शिंदे यांनी केली, तर आभार प्रदर्शन आयसीडीएस विभागाच्या स्नेहल गुप्ते यांनी केले.

महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल ७९ ग्रामपंचायतींमधील स्वयंसहाय्यता समूह सदस्य, ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, प्रभाग संघाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने एकल महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महिलांच्या सर्वांगीण विकास, सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...