कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद
कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद
कुंभरोशी प्रतिनिधी –
कुंभरोशी गणातील अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार असूनही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार आणि जनतेच्या सतत संपर्कात राहणारी कार्यपद्धती यामुळे समीर चव्हाण यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी असावी, हा अजेंडा घेऊन ते कुंभरोशी गणात घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न तसेच ग्रामविकासाशी संबंधित मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर समीर चव्हाण थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. “निवडणुकीपुरते येणारे नेते नव्हे, तर कायम जनतेसोबत राहणारा प्रतिनिधी निवडून द्या,” असे आवाहन ते प्रत्येक भेटीतून करत आहेत. त्यांच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत.
या प्रचारात बिरवाडी ग्रामस्थांनी विशेष उत्साह दाखवला असून त्यांनी समीर चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. गावोगाव प्रचार फेऱ्या, प्रत्यक्ष भेटी आणि चर्चा यामधून बिरवाडीतील नागरिकांनी त्यांना निवडणूक जिंकून देण्याचा चंग बांधल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, परिसराशी असलेली नाळ आणि कोणत्याही पक्षीय दबावाशिवाय काम करण्याची तयारी हीच समीर चव्हाण यांची मोठी जमेची बाजू असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
एकूणच कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार म्हणून समीर चव्हाण यांचा प्रचार दिवसेंदिवस बळावत असून “विकासासाठी अपक्ष” ही ओळख त्यांना जनतेमध्ये मिळत आहे. येत्या निवडणुकीत मतदार कोणाला संधी देतात, याकडे संपूर्ण गणाचे लक्ष लागले असले तरी सध्या तरी समीर चव्हाण यांच्या प्रचारातील उत्साह आणि लोकांचा पाठिंबा स्पष्टपणे जाणवत आहे.
Comments
Post a Comment