Skip to main content

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२४ : आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी:

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सन २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी प्रभागनिहाय आरक्षित जागा ठरविण्यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खादी व ग्रामोद्योग सभागृह, महाबळेश्वर येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

या सोडतीनंतर आरक्षणाचे तपशील ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाबळेश्वर नगरपरिषदेत प्रसिद्ध केले जाणार आहेत. यानंतर नागरिकांना या आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ अशी मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपली हरकत लेखी स्वरूपात, सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासक तथा मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालयात सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने पुढे सांगितले की, आरक्षण सोडतीची प्रक्रिया ही पारदर्शक व लोकसहभागावर आधारित असावी, यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीतील हा एक निर्णायक टप्पा मानला जात असून, आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी, राजकीय समीकरणे आणि प्रचाराच्या हालचालींनाही सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...