विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
✍️. प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असताना, महाड तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. शिवसेना पक्ष पुन्हा एकदा जिद्दीने आणि दमदार रणनीतीसह कामाला लागला असून, विरोधकांच्या छावण्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विशेषतः युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य व कोकण सचिव विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज महाड तालुक्यात झंझावात निर्माण करत आहे.
महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचा धडाका आणि युवा सेनेच्या नेतृत्वात असलेल्या विकासशेठ गोगावले यांचा जनसंपर्काचा दांडगा अनुभव पाहून अनेक कार्यकर्ते आता शिवसेनेच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत. त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे विन्हेरे जिल्हा परिषद गणातील राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला जबर धक्का.
काल दिनांक २६ ऑक्टोबर रोजी विकासशेठ गोगावले यांच्या लंबोदर निवासस्थानी झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात विशेषतः करंजाडी-तांबडे कोंड येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद विष्णू तांबडे, संजय भिकू तांबडे, प्रकाश रामा घोळे, विष्णू बारकू तांबडे, दिनेश रघुनाथ तांबडे, विश्वास रामचंद्र किलने, सखाराम नारायण महाडिक, ज्ञानेश्वर शांताराम महाडिक, गोपीनाथ गणपत तांबडे, प्रभाकर विष्णू तांबडे, संतोष महादेव तांबडे, रंजीत रमेश तांबडे, संजय पांडुरंग तांबडे, संदीप गोपाल तांबडे, किसन महादेव धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाचे आणि नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचे मनापासून कौतुक केले. त्यांचा प्रामाणिक, जनतेशी जोडलेला आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला, असे अनेक नव्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, युवा सेना महाड तालुकाप्रमुख रोहिदास आंबवळे, उपविभाग प्रमुख जालिंदर मोरे, जिल्हा परिषद संपर्कप्रमुख समीर कदम, उपतालुका प्रमुख बाळा सुतार, संपर्कप्रमुख प्रफुल खेडेकर, तसेच विनय बटावले, रमेश खिडेबिडे, संदीप खिडबिडे, सुबोध कासारे, दिलीप गोटल, संजय निकम, नितीन साळुंखे, सरपंच मंगेश चीचघरकर, गणेश पवार, गजानन सुतार, सुशील सुतार यांसारखे अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विन्हेरे विभागात मोठी राजकीय चुरस निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर विकासशेठ गोगावले यांनी या मतदारसंघात आपली संघटनशक्ती दुपटीने वाढवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले हे सलग पक्षप्रवेश पाहता, विन्हेरे विभागातील शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक मजबूत आणि विरोधकांसाठी आव्हानात्मक बनत आहे.
विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा "जनसंपर्काचा झंझावात" आता महाड तालुक्यातील राजकीय समीकरणेच बदलणार, यात कोणतेही संशय नाही.
Comments
Post a Comment