Skip to main content

पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवड्याची प्रभावी अंमलबजावणी होणार — तहसीलदार कपिल घोरपडे

पोलादपूर तालुक्यात सेवा पंधरवड्याची प्रभावी अंमलबजावणी होणार — तहसीलदार कपिल घोरपडे

पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
महसूल व वन विभागाकडून दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः पोलादपूर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली.

या कालावधीत सेवा पंधरवड्याचे उपक्रम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत —

 पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर 2025) — पाणंद रस्ते मोहिम

शिवारातील पाणंद/शेतरस्त्यांना क्रमांक देणे.

शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट 2025 च्या अंमलबजावणीद्वारे सर्वेक्षण.

वाजिब उल अर्ज व निस्तार पत्रकात नसलेले रस्ते नोंदवणे.

शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र घेऊन रस्त्यांची उपलब्धता निश्चित करणे.

रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.

रस्त्यांची मोजणी, सीमांकन, छायाचित्रे घेणे व अतिक्रमण यादी तयार करणे.

गाव नकाशांनुसार वर्गीकरण करून उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे मॅपिंगसाठी सादर करणे.

अतिक्रमित रस्त्यांबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 अन्वये सुनावणीद्वारे अतिक्रमण काढून टाकणे.

अतिक्रमणमुक्त रस्त्यांना सार्वजनिक रस्ते म्हणून नोंद देणे व त्यांना विशिष्ट सांकेतांक निश्चित करणे.

दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर 2025) — सर्वांसाठी घरे उपक्रम

ग्रामीण व नागरी भागातील शासकीय जमिनीवरील (वन विभाग वगळता) निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे.

शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2018, 17 नोव्हेंबर 2018 व 6 मार्च 2019 नुसार पात्र अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप.

1 जानेवारी 2011 पर्यंत झालेल्या निवासी अतिक्रमणांची यादी निश्चित करणे.

अतिक्रमणधारकांकडून पुरावे व अर्ज घेऊन भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करणे.

पात्र प्रकरणे समितीकडे पाठवून मंजूरी मिळाल्यानंतर सनद प्रदान करणे.

 तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) — नाविन्यपूर्ण उपक्रम

100% Direct Benefit Transfer (DBT) ची अंमलबजावणी.

आयुष्मान भारत कार्डबाबत जनजागृती व शिबिरे.

अधिकारी/कर्मचारी सेवा पुस्तके संगणकीकृत करणे.

तृतीयपंथी नागरिकांची यादी तयार करून त्यांना ओळखपत्रे देणे.

आदिवासी समाजास तात्काळ जन्म व उत्पन्न प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे.

महा-ई-सेवा केंद्रांची तपासणी, Feedback Register ठेवणे व QR Code द्वारे माहिती उपलब्ध करणे.

प्रत्येक गावाला स्मशानभूमी व प्रवेशरस्ता उपलब्ध करून देणे तसेच Geo Tagging करणे.

वीरमाता, वीरपत्नी, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना करणे.

तालुक्यातील किमान एका शाळा/महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू करणे.


तहसीलदार कपिल घोरपडे यांनी स्पष्ट केले की, सेवा पंधरवड्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर सविस्तर नियोजन करण्यात आले असून नागरिकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 सेवा पंधरवड्यामुळे पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळणार असल्याचा विश्वास तहसीलदारांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...