Skip to main content

रितेश देशमुख श्रीक्षेत्र महाबळेश्वर भेटीवर – "राजा शिवछत्रपती" चित्रपटासाठी लोकेशन पाहणी

📰 रितेश देशमुख श्रीक्षेत्र महाबळेश्वर भेटीवर – "राजा शिवछत्रपती" चित्रपटासाठी लोकेशन पाहणी

 महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे) :
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख यांनी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपट "राजा शिवछत्रपती" च्या शूटिंगसाठी लोकेशन पाहणी करण्यासाठी श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे आगमन केले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाने प्रभावित होत त्यांनी विविध स्थळांची पाहणी केली.

या दौऱ्यात रितेश देशमुख यांनी कृष्णामाई मंदिर परिसराला भेट देऊन दर्शन घेतले. कृष्णामाईच्या दर्शनावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंना सुवर्ण तुला केल्याचा प्रसंग दर्शविणारे चित्र भेट देण्यात आले. या दुर्मीळ भेटवस्तूचा स्वीकार करताना रितेश देशमुख भावूक झाले. त्यांनी छत्रपतींच्या जीवनगौरवातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते, असे सांगत “राजा शिवछत्रपती” या चित्रपटाद्वारे शिवचरित्र भव्य व ऐतिहासिक पद्धतीने उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र महाबळेश्वर व परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. या ठिकाणांची अनोखी शोभा व ऐतिहासिक महत्त्व पाहून ते प्रभावित झाले. “या परिसरातील लोकेशन्स चित्रपटाच्या भव्यतेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर लवकरच येथे शूटिंग सुरू करण्याचा मानस आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या भेटीच्या प्रसंगी श्रीक्षेत्र महाबळेश्वरमधील युवा कार्यकर्ते प्रदीप कात्रट, सरपंच सुनील बिरामणे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक प्रशांत कात्रट, तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्थानिक ग्रामस्थांनी रितेश देशमुख यांच्या या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत करत, “श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचावा,” अशी आशा व्यक्त केली.



Comments

Popular posts from this blog

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद

कुंभरोशी गणात अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांचा प्रचार जोमात; विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा वाढता प्रतिसाद कुंभरोशी प्रतिनिधी – कुंभरोशी गणातील अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार असूनही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार आणि जनतेच्या सतत संपर्कात राहणारी कार्यपद्धती यामुळे समीर चव्हाण यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी असावी, हा अजेंडा घेऊन ते कुंभरोशी गणात घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न तसेच ग्रामविकासाशी संबंधित मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर समीर चव्हाण थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. “निवडणुकीपुरते येणारे नेते नव्हे, तर कायम जनतेसोबत राहणारा प्रतिनिधी निवडून द्या,” असे आवाहन ते प्रत्येक भेटीतून करत आहेत. त्यांच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत. या प्र...

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण

घोगलवाडीत वन्यप्राण्याचा गाईवर हल्ला; शेतकऱ्याची दुभती गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील घोगलवाडी येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोगलवाडी येथील शेतकरी बबन धोंडू राजपुरे यांच्या गाईवर शनिवारी (काल) रात्री वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला वाघ अथवा बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी नेमका कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला होता, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. वन विभागाच्या तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्रीच्या वेळी जनावरे व शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्...